स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक उत्सव आनंदात साजरा #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase

पोंभूर्णा:- पोंभुर्णा येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल अँड ज्यू. कॉलेज ऑफ सायन्स येथे वार्षिक उत्सव उडान-२०२४ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी कदम तहसीलदार, मनोज गदाडे ठाणेदार, धम्माजी निमगडे पालक प्रतिनिधी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. संदीप ढोबळे होते. तर माधुरी ढोबळे आणि प्राचार्या रिजवाना शेख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या आवडीचे करिअर निवडावे, सातत्याने अभ्यास करावे आणि वाचन करावे असे संबोधिले. तहसीलदार शिवाजी कदम यांनी मोबाईल पासून दूर राहून मुलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला तर ठाणेदार मनोज गदाडे यांनी अभ्यासासोबतच व्यायामाचे महत्त्व पटवून सांगितले. संस्थेचे संचालक अध्यक्ष प्रा संदीप ढोबळे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांसोबत पालकांनी सुद्धा व्यायाम करावा तसेच विद्यार्थ्यांचे गृहपाठ आणि शाळेच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवून अभ्यास घ्यावा तसेच विद्यार्थ्यांचे मोबाईलचे व्यसन सोडण्याकरिता क्रीडा स्पर्धामध्ये त्यांना सहभागी करावे असे सांगितले.

या वार्षिक उत्सव उडान -२०२४ मध्ये क्रीडा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचे संचालन उपप्राचार्य राजीव खोब्रागडे आणि स्नेहा उराडे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.