मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा विकासात अग्रेसर! #Chandrapur #chandrapurloksabha

Bhairav Diwase
चंद्रपूर:- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारासमोर २१ विकास कामे दाखविण्याचे आवाहन केले. भाजप उमेदवार मुनगंटीवार विकासकामांच्या मुद्यावर मतदारांना मतरूपी आशिर्वाद मागित आहे. तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार आरोप-प्रत्यारोप करीत विकासाच्या मुद्याला बगल देतांना दिसत आहे.

चंद्रपुरात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचाविला आहे. जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची विकासकामे करत, पालकमंत्र्यांनी सामान्य जनतेसाठी अनेक विकासाची दालने उभी केली. यात सैनिकी शाळा, वन अकादमी, देखनी बसस्थानके, अनेक ठिकाणी ई - लायबरी, बॉटनिकल गार्डन, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कोषागार नियोजन भवन, भवन, अभ्यासिका, ९ वसतीगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल, वन विभागाची आकर्षक विश्रामगृहे इको पार्क, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील काँक्रीट रोड अशा अनेक योजनांच्या ख्पाने जिल्हा विकासात अग्रेसर ठरला आहे.

विशेष म्हणजे महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना रोजगाराभिमुख करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस.एन.डी.टी.) महिला विद्यापीठाचे उपकेंद्र तात्पुरत्या स्वरुपात नुकतेच सुरू झाले आहे. यात कौशल्यावर आधारीत ६४ प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्यात येतील. बल्लारपूर चंद्रपूर मार्गावर एस. एन. डी. टी विद्यापीठाचे भव्यदिव्य उपकेंद्र तसेच चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथे गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र साकारण्यात येत आहे.

२०२२ मध्ये महाराष्ट्राला गतीमान सरकार मिळाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वनखात्यासह सांस्कृतिक खात्याचीही जबाबदारी सोपविण्यात आली. प्रशासनात प्रत्येकाने 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्' राज्यगिताचा दर्जा मिळाला तो सुधीर मुनगंटीवार यांच्या सांस्कृतिक कार्य विभागातील ५० वाचनालय भागात वाचन संस्कृती उद्देशाने जिल्ह्यात पंचायत कारातून प्रत्येक तालुक्यात १५ तालुक्यात १५० तयार करण्यात आली आहे. पुढाकारामुळे. रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.

अलीकडेच चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकडाचा वापर हा संसदेच्या नवीन इमारतीसाठी म्हणजे सेंट्रल व्हीस्टासाठी आणि अयोध्येतीत राम मंदिरासाठी करण्यात आला आहे हे ही विशेष. पुढाकारामुळं वनमंत्यांच्या चंद्रपूर येथे जैवविविधता प्रशिक्षण केंद्र सुरु झाले. जैवविविधता संशोधन करणाऱ्या ७५ मुलांना जगभरातील विद्यापीठांसाठी तीन वर्षांत शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. वन कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या धतीवर लाम देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. प्राणी हल्ला, वणवा, तस्कर, शिकारी हल्ल्यात मृत्यू झाल्यास किंवा कायम अपंगत्व आल्यास कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना लाभ देण्याचा वनमंत्री धोरणात्मक निर्णय मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून घेण्यात आला. पुरस्कार देऊन कलावंतांचे प्रोत्साहन वाढवितानाच त्यांच्या कलांना राजाश्रय प्राप्त करून देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने व्यवसाय घेतला आहे. विभागातूनमत्स्य थकलेली डिझेलची देयके तात्काळ देण्यात आली. यापुढे देयक व्याजासह घेण्यात थकल्यास रक्कम देण्याचा निर्णय संकलनातील आला.
स्वामित्व तेंदूपत्ता शुल्क मजुरांना वाटप करण्यात येऊ लागले आहे. त्याचा फायदा राज्यातील दीड लाखावर कुटुंबांना होणार आहे. रॉयल्टीच्या स्वरूपात ७२ कोटी इतकी रक्कम जमा झाली आहे.
यापुढे या रकमेतुन प्रशासकीय खर्च न करता ही पूर्ण रक्कम मजूरांना बोनसच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. त्यामुळे आता जवळपास चौपट रक्कम बोनसच्या स्वरूपात मजूरांना मिळणार आहे.

ग्रामीण भागात १५० वाचनालय!

ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने जिल्ह्यात पंचायत विभागाच्या पुढाकारातुन प्रत्येक तालुक्यात १० याप्रमाणे १५ तालुक्यात १५० वाचनालये तयार करण्यात आली आहे.

७५ वर्षांवरील १० लक्ष जेष्ठ नागरिकांचा लालपरीने मोफत प्रवास

स्वातंर्त्याचे अमृत महोत्सवी वर्ष तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ७५ व्या वर्षात पदार्पणानिमित्त राज्य शासनाने १६ ऑगस्ट २०२२ पासून 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ७५ वर्षांवरील १० लक्ष २६ हजार ११ ज्येष्ठ नागरिकांनी लालपरीने मोफत प्रवास केला आहे.

वर्षभरात १२ हजार रुग्णांवर मोफत उपचार

आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात गत वर्षभरात एकूण १२०५९ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णांच्या उपचारापोटी राज्य शासनाकडून २६ कोटी ६१ लक्ष ७८ हजार ८४० रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

वर्षभरात ३९९४६ शेतक-यांना १६३ कोटी प्रोत्साहनपर लाभ

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत, कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांसाठी राज्य शासनाने प्रोत्साहनपर लाभ योजना अंमलात आणली आहे. गत वर्षभरात जिल्ह्यातील ३९९४६ शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाला असून राज्य सरकारतर्फे १६३ कोटी ११ लक्ष रुपये प्रोत्साहनपर रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी जिल्ह्याला ३१० कोटी

गतवर्षी जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फ अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला. या नुकसान भरपाईसाठी जिल्ह्याला ३१० कोटी ९८ लक्ष ९१४ रुपयांचा निधी २२ सप्टेंबर २०२२ रोजी प्राप्त झाला. या निधीचे वाटप करण्यात आले आहे.

तीन लाखावर जनावरांचे लसीकरण

चंद्रपूर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांवर लंम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव निदर्शनास आला. जिल्हा प्रशासनाने याबाबत उपाययोजना करून ३ लक्ष १० हजार २४० जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. ग्रामीण भागात ५३१३६ कुटुंबांना हक्काचा निवारा जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत ग्रामीण भागात आतापर्यंत ५३१३६ कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला आहे. यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३३८०५ तर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत १९३३१ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजने अंतर्गत एकूण २१७८ घरकुल मंजूर करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी जिल्ह्याकरीता ६००९ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. यशवंतराव मुक्त वसाहत योजनेंतर्गत विशेष बाब म्हणून २८०३ घरे मंजूर करण्यात आली आहे. महाप्रित अंतर्गत म्हाडामध्ये १० हजार घरे बांधण्यात येणार आहे.

जल जीवन मिशनच्या १३०४ योजनांना मंजूरी

जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सद्यस्थितीत १३०४ योजना मंजूर असून त्यापैकी १३०२ चे अंदाजपत्रक तयार झाले आहेत. यापैकी १२८४ योजनांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेत ३० कोटीचे वाटप

या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१७ ते २०२३ पर्यंत एकूण ७३, ८७५ इतक्या लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ६५ ७४४ लाभार्थ्यांना एकूण रु.३० कोटी ८ लक्ष ३० हजार इतक्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत ३४ कोटी मंजूर!

चंद्रपूर जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत ३४ कोटी ९८ लाख १४ हजार ४०० रुपये निधी मंजूर झालेला आहे.