कोविडच्या परिणामांसह उपायांवर आंतरराष्ट्रीय ई-परिषदेत चर्चा.

आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन.

आंतरराष्ट्रीय ई-परिषदेद्वारे कोरोनाच्या परिणामांवर चर्चा (चिंतामणी गृप ऑफ इन्स्टीटयुटस् व गोंडवाना विद्यापीठाचा उपक्रम).

Bhairav Diwase.   June 28, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा

पोंभुर्णाः- चिंतामणी गृप ऑफ इन्स्टीटयुटस्, बल्लारपुर च्या चिंतामणी काॅलेज ऑफ काॅमर्स पोंभूर्णा, चिंतामणी महाविद्यालय घुगुस, चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा, चिंतामणी काॅलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा व चिंतामणी काॅलेज ऑफ आर्ट अॅन्ड सायन्स गोंडपिपरी तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा महिला महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविड-19 चा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, विज्ञान व मानविकी वरील परिणाम’ या विषयावर द्वि दिवसीय आंतरशाखीय आंतरराष्ट्रीय इ-परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. 

      कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमिवर जगभरात विविध बाबींचे संकट उभे असतांना मानवी समाजाच्या विविध अंगांवर त्याचा होणारा परिणाम व त्यापरिणामांची तिव्रता कमी करण्याबरोबरच या संकटातून जागतीक अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षण, अभियांत्रिकी, इत्यादी विषयांच्या अभ्यासक, संशोधक व विचारवंतांनी वर्क फ्राॅम होम या संकल्पनेचे पालन करत आपले संशोधन व वैचारीक योगदान या परिषदेत दिले.

सदर परिषदेचे उद्घाटन व बीजभाषण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस यांनी केले. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठ गडचीरोली चे कुलगुरू डाॅ. नामदेव कल्याणकर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शान केले. प्रास्तावीक प्राचार्या डाॅ. सुष्मा देशमुख यांनी केले.

 प्रथम सत्रात प्रिन्सेन्टो न्युजर्सी अमेरीका येथील उद्योग व सायबर सेक्युरिटी विशेषज्ञ आशित दलाल यांनी कोरोनाचे औद्योगिक व सायबर सेक्युरिटी क्षेत्रातील परिणाम व उपाययोजना या विषयावर तसेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रूसा) चे वरिष्ट सल्लागार व सत्राचे अध्यक्ष डाॅ. प्रमोद पाबरेकर यांनी कामगार, उद्योग व उच्च शिक्षणातील बदल या विषयावर मार्गदर्शन केले.

  द्वितीय सत्रात माजी सहसंचालक उच्च शिक्षण व प्रसिध्द अर्थतज्ञ डाॅ. डिगांबर जहागिरदार यांनी कोविडचे आर्थिक व सामाजिक परिणाम तसेच उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले, तृतिय सत्रात भारतीय महामार्ग प्राधिकरणाचे आर्थिक सल्लागार निलेश साठे यांनी अर्थव्यवस्थेच्या बदलांचा विषय मांडला व उत्तर अमेरिकेतील अभिजित निखाडे यांनी सरकारच्या विविध योजनां बरोबरच आत्म निर्भर भारत योजनेवर सविस्तर चर्चा केली. महिला महाविद्यालय अमरावतीच्या प्राचार्या डाॅ. सुषमा देशमुख यांनी सत्राचे अध्यक्षीय भाषण केले.


 समारोप सत्रात गोंडवाना विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व सहचार्य विभागाचे संचालक डाॅ. मनिश उत्तरवार यांनी उच्च शिक्षणातील संभाव्य बदल या विशयावर सविस्तर मार्गदर्शन केले. चिंतामणी गृप आॅफ इन्स्टीटयुट चे सहसचीव तथा सत्राचे अध्यक्ष प्रा. मनिश पोतनुरवार यांनी यशस्वी उपक्रमासाठी सर्वांचे अभिनंदन केले. 


   सदर परिषदेसाठी युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका, युनायटेड किंडम, मोरक्को, ओमान, इंडोनेशिया, अंगोला, कॅनडा, नायजेरिया, फिलीपाईन, बांगलादेशासह भारतच्या सर्व राज्यातील 3780 अभ्यासकांनी नोंदणी केली. त्यातील जवळपास 250 संशोधकांनी आपले शोधनिबंध प्रकाशनासाठी पाठवीले तर 140 संशोधकांनी आपल्या संशोधनांचे वाचन ऑनलाईन पध्दतीलने केल्याची विक्रमी नोंद करण्यात आली.


    सदर परिषदेच्या विविध ऑनलाईन युटयुब लाईव्ह व्हिडीओचा लाभ जवळपास एकूण 30,000 व्हिव द्वारे अभ्यासकांनी लाभ घेतला आहे. 


सदर परिषदेच्या विविध सत्रांमध्ये गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचीव डाॅ. ईश्वर मोहुर्ले, चिंतामणी गृप ऑफ इन्स्टीटयुटस्च्या अध्यक्षा प्रा. शुभांगी दोंतुलवार, सचिव स्वप्निल दोंतुलवार, सदस्य प्रा. वृशाली दोंतुलवार, प्राचार्य प्रशांत दोंतुलवार व अन्य सदस्य तसेच नुतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डाॅ. माया शिराळकर, सचिव निनाद सोमण, व अन्य सदस्य तसेच प्राचार्य डाॅ. टी.एफ. गुल्हाने, डाॅ. चक्रधर निखाडे, डाॅ. एन.एच पठान, डाॅ. चंद्रशेखर कुंभारे, प्रा. डाॅ सुधिर हुंगे व आयोजन समिती सह महाविद्यालयाचे अनेक प्राध्यापकांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली. विविध सत्रांचे सूत्रसंचालन डाॅ. पूर्णीमा मेश्राम, डाॅ. शिला नरवाडे, प्रा. गणेश सुरजूसे, प्रा. अंकुश गिरी यांनी केले. अशी माहिती परिषदेचे संयोजक सहा. प्राध्यापक ओमप्रकाश सोनोने यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने