अपात्र ठरणाऱ्या वर फौजदारी गुन्हे दाखल करा:- अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद
Bhairav Diwase. June 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षा चा निकाल घोषित झाल्यानंतर त्यात अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर खरे आदिवासींना डावलून गैर आदिवासी बोगस जातवैद्यता प्रमाणपत्र सादर करण्यात आले असल्याची शंका असल्याने अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर आदिवासी भरती करा असा आक्षेप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद ने निवेदन देउन नोंदवले .
विशेषता औरंगाबाद जात पडताळणी समितीचे तत्कालीन सह आयुक्त .व .सु .पाटील यांच्या कालखंडात अनेकाना बनावटीचे जात वैद्यता प्रमाणपत्र वितरित करण्यात आले होते.उदा .कोष्टी लोकाना सुधा बनवट प्रमाणपत्र देउन आदिवासी बनविण्याचा व .सु .पाटील यांचे प्रयत्न केला परंतु खरे आदिवासी समोर आल्याने प्रयत्न फसले त्याच प्रमाणे यावर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वरेनिवड झालेल्या शेकडो उमेदवार पैकी काही बोगस जात वैद्यता प्रमाणपत्र सादर केल्याने ते उतीर्ण उमेदवार हे जात वैद्यता प्रमाणपत्र व जात पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती पत्र देण्यात येऊ नये व अपात्र उमेदवार यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांनी मा .सावली तहसीलदार कुंभरे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ऊधव ठाकरे .आदिवासीविकास मंत्री के .सी .पाडवी .मूख्य आयुक्त .मूख्य सचिव मुंबई यांना निवेदन देउन मागणी केली .
महाराष्ट्र लोकसेवा आयोग.मंत्रालय .जलसंपदा .महसूल विभाग.या सारख्या अनेकाना पदावरील नियुक्ती आदेश पूर्णता आदिवासी कि गैर आदिवासी उमेदवार आहेत करीता जात वैद्यता प्रमाणपत्र पडताळणी करूनच पात्र उमेदवार यांना नियुक्ती करावे व जात पडताळणी अंती बोगस उमेदवार यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय विकास परिषद च्या माध्यमातून निवेदन देउन करण्यात आली
तहसीलदार मॅडम यांना निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चंद्रपूर जिल्ह्याचे युवा अध्यक्ष अतुल कोडापे सावली तालुक्याचे युवा अध्यक्ष प्रवीण गेडाम आदी सदस्य उपस्थित होते.