Click Here...👇👇👇

आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सेवा दिवस म्हणून साजरा.

Bhairav Diwase
सर्व भाजपा, भाजयुमो पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा दिवस वेगवेगळे कार्यक्रम घेऊन साजरा.
Bhairav Diwase.    July 31, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) राहुल बिसेन उर्जानगर, चंद्रपूर
चंद्रपूर:- दिनांक 30/7/2020 ला महाराष्ट्र राज्याचे माजी वित्तमंत्री सन्म सेवा दिवस म्हणून सर्व भाजपा, भाजयुमो पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा दिवस वेगवेगळे कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येतो कुठे फळवाटप कुठे,सॅनिटायझर, मास्क तर कुठे गरजूंना मदतीची सामग्री देऊन हा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्याच अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून 30 जुलैला जन्माला आलेल्या बाळांना *शिशु बेबी किट* वाटप करून हा कार्यक्रम सर्वत्र जिल्हाभर साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे नेतृत्व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री.ब्रिजभूषणजी पाझारे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये गडचांदूर=1 राजुरा=1  गोंडपिपरी=3 बल्लारपूर=10 पोंभूर्णा=1 चंद्रपूर=16 वरोरा=8 भद्रावती=3 चिमूर=6 ब्रह्मपुरी=16 सावली=12 सिंडेवाही=15  असे एकूण=92 बाळांना बेबी किट चे वितरण करण्यात आले याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष श्री. विशालजी निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री आशिष देवतळे, युवती प्रमुख स्वातीताई देवाळकर,यश बागडे, स्नेहित लांजेवार, कुणाल गुंडावार, राहुल पाल,प्रतीक बारसागडे, पवन निखाते, सचिन यामावार, प्रसाद शेटे,गौरव राजूरकर, संजय पटले,प्रवीण उरकुडे, साजीद पठाण,अतुल रायकुंडलिया, वंदना संतोषवार,जयश्री आत्राम त्याचबरोबर मोठ्या संख्येत युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.