Top News

श्री. गुरूदेव हायस्कूल जिबगाव शाळेचा निकाल ९८%टक्के.

विद्यालयात एकुण ४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्या पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण.
Bhairav Diwase.    July 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला
  यात श्री. गुरुदेव हायस्कूल जिबगाव शाळेचा निकाल ९८%टक्के लागलेला आहे.या विद्यालयात एकुण ४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्या पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन श्री. गुरुदेव हायस्कूल जिबगाव ची विद्यार्थीनी कु. संजीवनी संजय वडुले व कु. काजल सुभाष अलाम ७७%टक्के गुण घेऊन दोघींनी ही प्रथम क्रमांक पटकाविला तर कु. आचल मनोहर गोहणे ७६.८०%टक्के गुण घेऊन द्वितीय तर कु. अमीक्षा विजय बारसागडे ७६%टक्के गुण घेऊन तृतीय आली. 
 यांच्या या परिश्रमा बद्दल  जिबगाव  येथे सर्वत्र  कौतुक होत आहे या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे श्री गुरुदेव हायस्कूल जिबगाव चे मुख्यधापक पि. टि. निकुरे उरकुडे सर, डोंगरे सर, येलचलवार सर, बन्सोड सर, व सर्व कर्मचारी यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने