Top News

पोंभुर्णा तालुक्यातील 10 वी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश प्राप्त.

आधार न्युज नेटवर्क तर्फे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Bhairav Diwase.    July 29, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील दहावी एसएससी परीक्षा मार्च 2020 चा निकालात तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घाटकुळ या शाळेचा निकाल 97.505% टक्के लागला असून वैष्णव रवींद्र देऊरघरे 92.20 टक्के रिया उत्तम देशमुख 91.00% काजल चांगदेव राडेगावकर 88% टक्के गुण प्राप्त केले.चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय बोर्डाचा निकाल 94. 79 टक्के लागला अजून तन्वी रवींद्र दाणी 86.80 टक्के श्रुती गजानन गोरंटीवार 86.20 टक्के समिक्षा रवींद्र बुरांडे 85 टक्के, वैष्णवी मुरलीधर वासलवार 84.80% औचित्य अतुल कोपावार 84.80 टक्के गुण प्राप्त केले. राष्ट्रमाता विद्यालय देवाडा खुर्द शाळेचा निकाल 98. 50% लागला असून प्रदीप पिपरे 87.20% उत्कर्षा विजय देउरमले 81.40% , माधुरी गुरुदेव मंढरे 80.80 टक्के गुण प्राप्त केले. गंगाराम नाईक आश्रम शाळा  आंबेधानोरा शाळेचा 98. 50 टक्के निकाल लागला असून संदीप पण्यालवार यांनी 88.55 टक्के, शासकीय आश्रम शाळा देवई चा निकाल 100% टक्के लागला असून भूषण छत्रपती गेडाम यांनी 70.20 टक्के गुण प्राप्त केले. श्री साईकृपा विद्यालय चिंतलधाबा शाळेचा 96.72% निकाल लागला. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने