Top News

जनता विद्यालय नेरीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

31 विद्यार्थी 75 टक्केचे वर गुण घेऊन प्राविन्यप्राप्त.
Bhairav Diwase.    July 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरी या गावातील प्रतिष्ठित  जनता विद्यालय नेरी या शाळेने इयत्ता 12 वी व 10 वी च्या निकालात आपल्या उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली आहे . या वर्षी 10 विचा निकाल 95.29% लागला असून 12 विचा निकाल 92.42% लागला आहे. या शाळेत नेरीसोबतच अनेक खेड्यातील मुले शिक्षण घेण्यासाठी येत असतात या वर्षी खुटाळा या लहान गावातील स्वानंद तुलाराम बारसागडे याने 89.60% टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम येऊन खेड्यातील मुले कमी नाही हे दाखवून दिले. नेरीतील चेतन ओमप्रकाश पिसे हा 89.40% द्वितीय तर सुषमा विलास शिवरकर 85.20% तृतीय आहे. या सोबतच 31 मुले 75% चे वर गुण प्राप्त करून प्राविन्यप्राप्त यादीत आहेत. 12 व्या वर्गातील सिरपूर या खेड्यातील कु. आचल विलास मोहूर्ले ही 78.46% घेऊन प्रथम तर अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण घेणारे शंतनू शांतीलाल राठोड 77.79% द्वितीय तर योगिता प्रकाश नान्हे 72.76% तृतीय आहे. 
 सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई , वडील, गुरूजण यांना दिले तसेच लोक कल्याण मंडळ नेरी चे समस्त संचालक मंडळ, शाळेचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने