१ ऑगस्ट ते 2 ऑगस्ट पर्यंत चिमूर कडकडीत बंद.

मेडिकल व दवाखाने व्यतिरिक्त सर्व दुकाने राहणार बंद.
Bhairav Diwase.    July 31, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर शहरात कोरोना पोजिटिव्ह रुग्ण आढळुन आल्याने तसेच रुग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढत असल्याने नगर परिषद चिमूर क्षेत्रात दिनांक १ ऑगस्ट २०२०ते २ ऑगस्ट २०२० या दोन दिवसांकरिता कडकडीत बंद ठेवण्यात येत आहे. मेडिकल आणि दवाखाने चालू राहतील या व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद राहतील. नागरिकांनी अत्यावश्यक सेवा सोडून इतर कुठल्याही कारणाने बाहेर पडू नये.

वरील आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती, संस्था ,समूह यांना साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, 269, 270, 271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. याची गांभीर्याने नोंद घेण्याचे आवाहन चिमूर नगरपरिषद चे मुख्यधिकारी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत