Top News

गडचांदूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी देवराव भोंगळे यांना दिल्या जिल्हाध्यक्षांच्या शुभेच्छा.

घुघुस येथील निवासस्थानी जाऊन गडचांदूर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी मनस्वी शुभेच्छा दिल्या.
Bhairav Diwase.    July 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद चंद्रपूर चे अध्यक्ष मा देवराव भाऊ भोंगळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज त्यांचे घुघुस येथील निवासस्थानी जाऊन गडचांदूर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी मनस्वी शुभेच्छा दिल्या.
        त्यानंतर उपस्थित गडचांदुर च्या भाजपा कार्यकर्त्या सोबत मा देवरावभाऊनी सर्वप्रथम गडचांदूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावा बाबत कार्यकर्त्यांकडून  आढावा जाणून घेतला. कोरोना मध्ये आपणाला सुद्धा काय मदत करता येतील ते करायला मागे येऊ नका. पक्ष संघटनात लक्ष दया. देश्याचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी सरकारच्या २.० वर्ष पूर्ती निमित्य राबविण्यात येत असलेल्या जनसम्पर्क अभियान गावागावात राबवा.प्रत्येक घरी जाऊन त्यांचे कडून माहिती घेऊन फॉर्म भरून घ्या.
पक्षसंघटनावर भर दया मला पक्ष्यानी फार मोठी जबाबदारी दिली असून ती पार पाडण्यासाठी सर्व भाजपाच्या लहान मोठ्या कार्यकर्त्यांच्या मदतीची गरज आहे.चंद्रपूर जिल्हात भाजपा पक्ष मजबूत करायचा आहे तरी सर्वांनी एकजुटीने कामाला लागा.
             येत्या 30 तारखेला माजी वित्त व नियोजन मंत्री तथा विकास पुरुष मा.सुधीरभाऊंचा वाढदिवस आहे तेव्हा कुणीही बॅनर, पोस्टर लावून साजरा न करता लोकापयोगी कार्यक्रम करून साजरा करावा असे सुद्धा सांगितले. पक्ष संघटना करिता जेव्हा जेव्हा माझी गरज भासेल तेव्हा तेंव्हा मी आपल्या मदतीत तत्पर राहील असे सांगितले
त्यावेळी गडचांदुरचे भाजपा कार्यकर्ते शिवाजी शेलोकर, महादेव एकरे, सतीश उपलेंचिवार, निलेश ताजने, अरविंद डोहे, रामसेवक मोरे, संदीप शेरकि, हरिभाऊ घोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने