गडचांदूर येथील कोविड केअर सेंटरला भेट.
Bhairav Diwase. July 26, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता, गडचांदूर येथे अँन्टीजेन चाचणी सुरू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली. कोरोना विषयक आढावा बैठक घेताना ते बोलत होते. गडचांदूर येथील कोविड केअर सेंटरला त्यांनी यावेळी भेट दिली.
कोविड केअर सेंटरमधील नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कोविड केअर सेंटरमध्ये आणखी नागरिकांच्या सुविधेसाठी उपाययोजना करण्याची सूचना संबंधित अधिकारी यांना त्यांनी दिल्यात.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी श्री.लोंढे, तहसिलदार महेंद्र वाकलेकर, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नाळे, डॉ. टेंभे व इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, कोरोना संदर्भात नगर परिषद सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. गडचांदूर शहरात लॉकडाऊन संदर्भात चर्चा झाली. परंतु, शहरातील आढळून आलेल्या बाधितांचा प्रवासाचा इतिहास असल्याने व त्यांचा इतरांसोबत कॉन्टॅक्ट नसल्याने लॉकडाऊनची गरज नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत