आमदार बंटी भांगडीया यांचा लोकपयोगी उपक्रम.
Bhairav Diwase. July 26, 2020
चिमूर:- आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी भांगडीया फाउंडेशन च्या माध्यमातून प्रथम कन्या झालेल्या लाभार्थ्यांना 5 हजार रुपये धनादेश देऊन पुढील 23 वर्षात 40 हजार रुपये लग्न कार्या साठीची लोकोपयोगी योजना अंमलात आणली आहे .
स्व धापुदेवी गोटुलालजी भांगडीया स्मृती प्रित्यर्थ प्रथम कन्या झालेल्या लाभार्थ्यांना 5 हजार रुपयांचा धनादेश पस सदस्य प्रदीप कामडी यांचे हस्ते देण्यात आले .
यावेळी प.स सदस्य प्रदीप कामडी,भिसी जिल्हा परिषद प्रमुख नितीन गभणे ,भिसी ग्राम पंचायत सदस्य देवेंद्र मुंगले आकाश ढबाले आदी उपस्थित होते .
विकी कोरेकर अरुण लोहकरे यांनी धनादेश वाटपाचे काम पाहिले भिसी जिल्हा परिषद क्षेत्रातील लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.