Bhairav Diwase. July 26, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत सीसीआय मार्फत 4 लाख 31 हजार 885 क्विंटल कापसाची खरेदी केली तर राज्य कापूस पणन महासंघाने 2 लाख 10 हजार 137 क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. थेट पणन परवानाधारकामार्फत 4 लाख 82 हजार 700 क्विंटल तसेच बाजार समिती परवानाधारक यांच्यामार्फत 19 लाख 19 हजार 503 क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.
कोरोना संकट काळात सुद्धा सीसीआय व कापूस पणन महासंघाने आजपर्यंत अनुक्रमे 35.70 व 36.75 लाख याप्रमाणे 72.45 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे.
जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी 36 कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. या कापूस खरेदी केंद्राद्वारे शासकीय हमीभावाने कापूस खरेदी करण्यात येत आहे.