सामाजिक संस्थानी घेतली दखल, 'पदमा'ला मिळाली सायकल.

Bhairav Diwase
0
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मधुमडगु या गावातील पदमा कंकबंडीवार.
Bhairav Diwase.    July 26, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
अहेरी (गडचिरोली जिल्हा):- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मधुमडगु या गावातील पदमा कंकबंडीवार 12 विच्या परीक्षेत तालुक्यातून सेकेंड मेरीट आली. पदमाचे आई-वडील मजुरी करतात. त्यामुळे तिच कुटुंब हातावर आणून पानावर खाणारे आहे. अंगणात बांधलेली एक म्हैस, दोन शेळ्या, कुडाचे घर आणि पावसाळ्यात अंगणात साचलेला चिखल. अशा परिस्थितीत जगताना सुद्धा पद्माला शिक्षणाचा मोह आवरता आला नाही. शाळेवाचून मिळालेल्या फावल्या वेळात ती कामाला जाते.
 'प्रतिबिंब' चनेल तर्फे पदमाची मुलाखत घेण्यात आली होती. कमी वयात तिचे ठरवलेले ध्येय, शिक्षणाची ओढ, अधिकारी बनून आकाशाला गवसणी घालण्याचे तिचे स्वप्न बघून पदमाचे कौतुक झाले. प्रतिबिंबशी बोलत असताना 'पाचवीत मिळालेली सायकल आता निकामी झाली आहे, त्यामुळे मला रोज तिन किमी अंतर पायी शाळेत जावे लागते'असे पदमाने सांगितले होते. तिला सायकल मिळवून देण्यासाठी  'प्रतिबिंब' च्या पुढाकाराने एक मेसेज सोशल  मीडियावर वायरल करण्यात आला होता. चंद्रपूर येथील प्रतिंबिंब च्या मार्गदर्शक व एल्गार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ जयश्री कापसे गावंडे , चंद्रपुर बचाव संघर्ष समितीचे डॉ मुंदड़ा व सर्व सदस्य , आलापल्ली येथील सब डी. एफ. ओ. नीलेश गेडाम, अंगणवाडी सुपरवायझर सुशीला भगत, सामाजिक कार्यकर्ता सारिका उराडे व मयूर सेठीया यांनी दखल घेतली व आर्थिक सहकार्य केले . या सर्वांच्या मदतीने पदमाला सायकल भेट देण्यात आली. या प्रसंगी पदमाला गहिवरून आले व तिने सर्वांचे आभार मानले . या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिबिंबचे संचालक व जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहूल पेंढारकर, प्रतिबिंबचे मार्गदर्शक श्रीराम पान्हेरकर  व सदस्य सचिन खोब्रागडे, मोहन चांदेकर, टीना उराडे, आरती गेडाम, रेखा डे, मोना गेडाम, प्रतिक गेडाम, रागिणी उईके आदि यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)