Top News

उपनगराध्यक्ष जोगी व नगरसेविका कांबळे यांच्या कडून गरजू कुटुंबांना धान्य किट वाटप.

कोरोना रुग्णामुळे मजुरी करणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ.

जोगीच्या प्रयत्नाने गरजू कुटुंबांची पेटली चूल.
Bhairav Diwase. Aug 21, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- सात दिवस आधी प्रभाग एक मध्ये बाहेरून आलेला कोरोना रुग्ण आढळला त्यामुळे तो एरिया सील करण्यात आला. तेथील दहा ते पंधरा कुटुंब हाताला मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात पण तिथला एरिया सील झाल्या मुळे त्यांच घराबाहेर पडणं बंद झालं अश्यातच होत नव्हतं ते धान्य सम्पले याची माहिती राष्ट्वदीचे प्रवीण मेश्राम यांनी शरद जोगी याना दिली त्यांनी कोणताही वेळ वाया न जाऊ देता त्वरित तेथील तेरा कुटुंबांना धान्य किट व भाजीपाला पुरविला या सोबतच सर्व गरजू कुटुंबानी त्यांचे आभार माणून प्रेमाचा आशीर्वाद दिला. समाज कार्यात गडचांदूर शहरात अग्रेसर असणारे जोगी सर्वांचे लाडके उपनगराध्यक्ष बनले सर्वाना मदतीचा हात देणारे पहिले उपनगराध्यक्ष आहे त्यांचा समाज कार्यात मोलाचा वाटा आहे असे मत तेथील जनतेचे आहे
या साठी सर्व नगर वाशियकडून शरद भाऊ जोगी, अश्विनी कांबळे नगर सेविका, करण शिंग, विनोद हरणे, राज सलाम.भोगेकर मॅडम, सुभे मॅडम, चिकणकर मॅडम सर्व राष्ट्वादी पक्षाचे कार्यकर्त्यांचे तेथील जनयेने मानले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने