Top News

ऊसेगाव-जिबगाव-हरंबा रस्त्याची दुरवस्था.

रस्त्यावर जीवघेणे खडे.

संबंधित विभागाचे दुर्लक्ष.

अपघात होण्याची शक्यता.
Bhairav Diwase. Aug 20, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- ग्रामीण भागातील जनतेचा शहराशी संपर्क व्हावा वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून गाव तिथे रस्त्याची निर्मिती करण्यात आली मात्र सततच्या ओव्हरलोड आणि पावसाच्या धडाक्यात रस्त्याची कशी वाट लागते त्याचे ताजे तावाने उदाहरण उसेगावं जि बगाव हरांबा मार्गावर पडलेल्या जीवघेण्या रस्त्यावरून दिसून येते आहे त्यामुळे रस्त्याच्या वेळोवेळी करण्यात आलेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण केला जात आहे मग शासनाचा कामानिमित्त खर्च झालेला लक्षावधी रुपये व्यर्थ जातात की काय मात्र कंत्राट दार कामे करून मोकळे होतात या बाबतीतही शंका व्यक्त केली जात आहे सदरच्या रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या रस्त्यामुळे वाहतूकीची कोंडी निर्माण होत असून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे गेली आठवड्या पासून रिमझिम पावसाची झळ सुरू असून रस्त्यावर पडलेल्या खड्यात पाणी साचून राहत असल्याने खड्याचा अंदाज सजल्या जात नसल्याने पाणी भरलेली डोबाळ अपघाताला आमंत्रण देणारी ठरत आहे त्यामुळे वाहतूक दारांना आपली वाहने काळजी पूर्वक नेल्याशिवा य पर्याय उरला नाही अशी रस्त्याची दुरवस्था निर्माण झाली आहे सदरचा मार्ग सावली जिब गाव हारंबा ते गडचिरोली जिल्हा ला जोडणारा दुसरा मुख्य मार्ग असताना पडलेल्या जीवघेण्या रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे विशेष म्हणजे सदर मर्गा लागत चंद्रपूर गडचिरोली या दोन्ही जिल्हा शिमालगत वैनगंगा नदी वाहत असल्याने आणि रेतीचे घाट असल्याने मोसम कोणताही असला तरी सर्रास रेतीची चोरटी वाहतूक केली जात असल्याने ओव्हरलोड वाहतूकी मुळे या भागातील रस्ता एका बाजूने दबल्या गेल्याचेही परिस्थिती निर्माण होते असते वाहतू कीची कोंडी निर्माण करून अपघाताला आमंत्रण देणाऱ्या रस्त्याची डागडुगी तरी करून द्यावी अशी मागणी जोर धरत असून या बाबत प्रहार सेवक राकेश गोलेपलिवार यांनी संबंधित विभागाकडे निवेदन देऊन रस्त्याच्या कामाची मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने