Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा येथे रंगनाथन जयंती साजरी.

Bhairav Diwase. Aug 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा येथे रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. टि.एफ. गुल्हाने (प्राचार्य), प्रमुख पाहुणे म्हणून चिंतामणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एच. पठान, प्राचार्य गिरीपुंजे शैलेश यांनी सोशल डिस्टंसिंग पाडत डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. त्या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.टि.एफ. गुल्हाने मिणाले की, ग्रंथालय महत्त्वपूर्ण अभ्यास करण्याचे स्थान आहे. प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी रोज आणि नित्य नियमाने ग्रंथालयाचा वापर करावा. जास्तच जास्त प्रमाणात पठण करावे. आणि ग्रंथालयाचा वापर करावा. असा संदेश दिला. प्राध्यापक डॉ. पूर्णिमा मेश्राम, प्रा विजय बुधे(ग्रंथपाल), विशाल कटकमवार इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने