चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाद्वारे साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्राध्यापक सतीश पिसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंसिंग चे पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.