चंद्रपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सुरपाम कोरोना पॉझिटिव्ह.

Bhairav Diwase
चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय वर्तुळात खळबळ.
Bhairav Diwase. Aug 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुरपाम कोरोना पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली, त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचीही चाचणी केली जात आहे. वैद्यकीय यंत्रणेतील प्रमुखालाच कोरोनाची बाधा झाल्याने यंत्रणेत खळबळ उडाली आहे.