Click Here...👇👇👇

अंगुलिमाल उराडे यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार जाहीर.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 12, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- संत रविदास बहूभाषिक चर्मकार जनहित सेवा समिती औरंगाबाद* तर्फे चंद्रपुर जिल्ह्यामधील मुल तालुक्यातील बेंबाळ गावचे युवा साहित्यिक अंगुलिमाल मायाबाई उराडे यांची राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराकरीता नुकतीच निवड झाली आहे.
लेखक/कवी :- अंगुलिमाल मायाबाई उराडे यांनी सन 2019 मध्ये मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन पक्ष्यांसाठी झाडाझाडावरती जलपात्र लटकवून दररोज त्यामध्ये पाणी भरायचे, पक्ष्यांना खाद्य टाकायचे अशा प्रकारे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पक्षी वाचवा अभियान राबविले.
विषारी साप, विंचू , पक्षी यांना जिवनदान देने, अत्यंत गरीबीत जन्मला येऊन त्यांनी लेख, कविता, चारोळी, एकांकिका, पथनाट्य इत्यादी माध्यमांतून पर्यावरण, बेटी बचाव बेटी पढाव, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी, सामाजिक, राजकीय, झाडे लावा झाडे जगवा, स्त्रियांवर होणारे अत्याचार, बलात्कार इत्यादी विषय हाताळून जनजागृती केलेली आहे. आतापर्यंत या सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक सेवाभावी संस्था व संघटनांनी साहित्यिक अंगुलिमाल मायाबाई उराडे यांना आजपर्यंत अनेक‌ पुरस्कार प्रदान केलेले आहेत.
या सर्व कार्याची दखल घेत *संत रविदास बहूभाषिक चर्मकार जनहित सेवा समिती औरंगाबाद* या सामाजिक संस्थेच्या वतीने साहित्यिक अंगुलिमाल मायाबाई उराडे यांची *राष्ट्रीय समाजरत्न* पुरस्कारासाठी निवड केली आहे. कवितांमधून जनजागृती केलेली आहे. आतापर्यंत या सामाजिक संस्था व संघटनांनी त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार प्रदान केलेले आहेत. याच वर्षी 02 फेब्रुवारी 2020 रोजी, वेदा जनजागृती मंच महाड (चवदार तळे) जिल्हा रायगड वतीने त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
त्यांच्या सर्व कार्याची योग्य ती दखल घेत संत रविदास बहूभाषिक चर्मकार जनहित सेवा समिती औरंगाबाद या सामाजिक संस्थेच्या वतीने लेखक/कवी - अंगुलिमाल मायाबाई उराडे यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समितीचे अध्यक्ष श्री. महादू सुरडकर साहेब यांनी या संदर्भात यांना निवड पत्र पाठविलेले आहे. जगात आणि भारतात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची भारतातील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करुन सन्मानपुर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.