संबंधित शाळांवर कार्यवाही करा, शिवसेनेचे बबन उरकुडे आणि राजू डोहे यांची मागणी..
चंद्रपूर:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा बंद असून राजुरा शहरातील काही खाजगी शैक्षणिक संस्था ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या नावावर पालकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत आहे. चालू परिस्थितीत लोकांचा रोजगार बुडाला असून आकारण्यात येणारे शुल्क अतिशय चिंतेची बाब आहे.
याच अनुषंगाने शिवसेना राजुऱ्याच्या वतीने आज तहसीलदार राजुरा यांना लेखी निवेदन देऊन संबंधित विषयात लक्ष घालून पालकांना न्याय मिडवून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात राजुरा शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बबनभाऊ ऊरकुडे,नगरसेवक राजुभाऊ डोहे , निलेशभाऊ गम्पावार, वसिम अन्सारी, सुनिल लेखराजनी, ऊमेश गोरे, शु़भम पोलजवार, जावेदभाई, अजय सखिनाला, समीर शेख प्रतिक घोटेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत