Top News

गोपीनाथ मुंडे अपघात विम्यातील प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावे:- भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल कोलते.

Bhairav Diwase. Aug 12, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- मागील भाजप शासनाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना अंमलात आणली असता चिमूर तालुक्यातील अनेक प्रकरणे विमा

कंपनीने प्रलंबित ठेवले असल्याने त्या अन्यायग्रस्त कुटूंबियांना वंचित राहावे लागत आहे .तेव्हा शासनाने चिमूर तालुक्यातील गोपीनाथ मुंडे अपघात विमा मधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल कोलते यांनी केली आहे .

     गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना मागील भाजप शासनाने अमलात आणली होती. त्या योजनेत शेतात आकस्मिक किंवा नैसर्गिक मृत्यू पडल्यास विमा योजनेचा लाभ त्या मयताच्या वारसांना मिळत असतो तेव्हा चिमूर तालुक्यातील अनेक प्रकरणे विमा कंपनी कडे पाठविण्यात आली. परंतु विमा कंपनीकडे योग्य कागदपत्रे पाठविण्यात आली परंतु नमुना क वारसांन प्रत ही मागील चिमूर तहसील जळीत कांड मध्ये जळली .त्या मुळे नमुना क वारसान पत्र तहसील कार्यालय कडून मिळत नाही तरी तहसीलदार यांनी विमा कंपनी कडे सविस्तर पत्र व्यवहार केला असला तरी  विमा कंपनी ही दुर्लक्षित करीत असल्याने अनेक योजनेचे लाभार्थी वंचित राहत आहे तेव्हा प्रशासन ने दखल घेऊन ते प्रकरणे निकाली काढण्याची मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल कोलते यांनी केली असून अन्यथा त्या विमा कंपनीस काळ्या यादीत टाकण्याची सुद्धा मागणी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने