Top News

चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्र-५ मध्ये अनेक समस्यांचे डोंगर.

चिमूर नगरपरिषद प्रशासनाला अनेक निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाचे प्रभागागाकडे दुर्लक्ष.
 प्रभागातील अनेक समस्येवर प्रशासनाने त्वरित ठोस निर्णय घ्यावा अशी भाजपा तालुका उपाध्यक्ष हरिष पिसे यांची मागणी.
Bhairav Diwase.    Aug 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- नगरपरिषद चिमूर प्रशासनाला गेल्या काही वर्षापासून प्रभागातील जनतेने प्रभागात निर्माण झालेल्या अनेक समस्यांबद्दल अनेक निवेदन दिले व मागण्या केल्या…
तरी,सुद्धा नगरपरिषद प्रशासनाचे प्रभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे आणि नागरिकांच्या प्रत्येक मागणीसाठी टाळाटाळ सुद्धा होत असल्याचे दिसत आहे.
गेल्या काही वर्षांपासून नगरपरिषद चिमूर येथे काँग्रेस पक्षाची सत्ता असून त्यांच्या मार्फ़तच नगरपरिषदेचा कारभार सुरू असून गेल्या काही वर्षापासून प्रामुख्याने प्रभाग-०५ कडे नगरपरिषद प्रशासनाचे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.असे मत प्रभागातील सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत.
अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे तयार झाले आहेत तर काही ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचा अजिबात पत्ता नाही,काही ठिकाणी खाली जागेवर सुद्धा   मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असून त्या साचलेल्या पाण्यामुळे काही इमारतीच्या भिंतीं सुध्दा खचल्याच्या घटना आढळुन आल्या आहेत,तर,काही इमारतीच्या पायवाच खचून असल्याचे निदर्शनास येत आहे याचे मुख्य कारण,म्हणजे सांडपाणी असून ते जागो-जागी साचून आहे व कोणत्याही प्रकारच्या नाल्या किंवा तात्पुरते पाण्याचा निचरा होईल अशी सुविधा सुध्दा उपलब्ध नाही, प्रभागातील जवळजवळ सर्वच सांडपाण्याचा निचरा होत नसून पाणी वर्षभरच जागो-जागी साचून राहत असून दिवसेंदिवस प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यावर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्यांचे आरोग्य धोक्यात आहे .,नगरपरिषद चिमूर प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे व योग्य त्या सुविधा जनतेला पुरविण्यात याव्यात अन्यथा प्रभागातील जनतेलाच एकत्र येऊन नगरपरिषद प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारावे लागेल असा इशारा भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री हरीश पिसे यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने