Top News

पाच बधितांचा मृत्यू, नवीन 230 रुग्ण.

बाधितांची एकूण संख्या 9812

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 5690 बाधितांना डिस्चार्ज

उपचार सुरु असणारे बाधित 3974
Bhairav Diwase. Sep 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 230 बाधित पुढे आले आअसून जिल्ह्यात पाच बाधित यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 9 हजार 812 झाली आहे. यापैकी 5 हजार 690 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 974 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.


जिल्ह्यात आतापर्यंत 148 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 139, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन आणि यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.


चंद्रपूर : लाखांदूर, भंडारा (४६, महिला), श्यामनगर चंद्रपूर (६०, महिला), बनवाही, नागभीड (६५, पुुुरुष), ब्रह्मपुरी (७०, पुरुष) व चुनाभट्टी, राजुरा (७४, पुरुष) यांचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात 230 कोरोनाबाधित आढळले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने