Top News

नगरपंचायत मध्ये कोरोनाचा शिरकाव.

मुख्याधिकारी झाले बाधीत; नगरपंचायत केले बंद.
 Bhairav Diwase. Sep 28, 2020
 (आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
 सावली:- सावली शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असून शासकीय कार्यालये ही बाधीत होत आहे. आत्तापर्यंत तहसिल कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख कार्यालय, शाळा, असोला मेंढा नूतनीकरण विभाग मध्ये कोरोना ने दस्तक दिली आता नगरपंचायत मध्ये कोरोना बाधीत ची संख्या वाढत असून आज चक्क मुख्यधिकारी मनीषा वाजाळे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली असून, तातडीने नगरपंचायत सीलबंद करण्यात आलेला आहे. नागरिकांनी सजग राहावे असे आव्हान अनेक दिवसांपासून प्रशासन करीत आहे मात्र या कडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. सद्या चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यु आहे. शहरातील सर्व व्यापार हा बंद आहे. मात्र विनाकारण फिरणारे तसेच गाड्या व हुल्लळबाज युवकांची संख्या ही वाढत आहे. मात्र पोलीस प्रशासन हे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने