Click Here...👇👇👇

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या जिल्हाधिकारी यांना सुचना.

Bhairav Diwase

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली श्री करण गौरकार यांच्या फोनची दखल.

विषय होता सर्वे मध्ये ऑक्सिमीटर वापरताना योग्य ते सॅनिटायझेशनचे नियम पाळले जावेत.
Bhairav Diwase. Oct 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:-

⭕सॅनिटायजर वापरले गेले नाही.....

चंद्रपुर जिल्ह्यातील ग्रामीण विभागात आरोग्य पथक सर्व्हे करतांना काही ठिकाणी ऑक्सिमीटर वापरताना सॅनिटायजर वापरले गेले नाही. यामुळे उलट कोरोना व्हायरस चा प्रसार होऊ शकण्याची शक्यता वाढू शकते. हि बाब श्री. करण (बंङू) गौरकार यांच्या लक्षात आली. आरोग्य यंत्रणेकडून असे करणे बाबत नीटशी माहिती मिळाली नाही. 

श्री करण गौरकार यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकङे फोनवरून नागरिकांच्या आरोग्य दृष्टीने अहितकारक ठरू हि शकणारी बाब लक्षात आणून दिली. याबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी लगेच दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेस योग्य कार्य करणेचे निर्देशित करावे अशी सुचना दिली. 

⭕ असा प्रसार होण्याची शक्यता.....

शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण तपासणीसाठी ऑक्सिमीटरच्या कॅव्हिटीत हाताचे बोट ठेवल्यास शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण वरून कोरोनाचा संभवित धोका परिणाम याचा अंदाज कळू शकतो. एकच ऑक्सिमीटर अनेक नागरिकांना वापरले जाणार तर यात जर एखादा रूग्ण असेल तर मग व्हायरस त्या बाधितापासुन नंतर ते ऑक्सिमीटर ज्या नागरिकांसाठी वापरले जाणार त्यांना देखील व्हायरस ची बाधा होण्याची शक्यता होऊ शकते. हे टाळण्यासाठी योग्य पध्दतीने ज्यांचे तपासणी करायची त्यांचे तपासणीसाठी वापरले जाणाऱ्या बोटाला सॅनिटायजर लावणे गरजेचे. आरोग्य विभागाने हि काळजी घेणे गरजेचे आहे.

(बातमी संकलन:- पियुष मेश्राम)