ती आमच्या हक्काची ग्रंथालय इमारत आम्हाला मिळाली नाही तर, आम्ही नगरपंचायत समोर आंदोलन करु.
Bhairav Diwase. Oct 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गेल्या सहा महिन्यांपासून शाळा व महाविद्यालये व इतर शैक्षणिक क्षेत्र बंद आहे. बाहेरगावी शिकणारे व गावी शिकणारे कित्येक तरुण विद्यार्थी घरी बसून आहेत. येणाऱ्या पोलीस भरती व लोकसेवा भरती काही महिन्यातच होणार आहे व विद्यार्थांना प्रतिकूल असे वातावरण त्यांच्या घरात लाभत नसल्यामुळे व कुटुंब संख्या जास्त असल्यामुळे तरुण विद्यार्थांना अभ्यासाची सोय होत नाही आहे म्हणून आपल्या नगरामध्ये या तरुण विद्यार्थांची समस्या समजून विद्यार्थांना लवकरात लवकर ग्रंथालयाची असलेली इमारत उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी तालुका गोंडपिपरी यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना, आणि राजुरा विधानसभेचे आ. ॲड संजय धोटे असताना विद्यार्थांची मागणी लक्षात घेताच गोंडपिपरी शहरात ग्रंथालय इमारत देण्यात आली. तसेच त्या ग्रंथालय इमारतीचे लोकार्पण सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांच्या मनात आनंद निमार्ण झाला होता. परंतु नगर पंचायत कार्यालय इमारतीचे काम सुरू करायचं आहे. त्यामुळे गोंडपिपरी तालुक्यातील नगर पंचायत स्थलांतर करुन ग्रंथालय इथे हलविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ती आमच्या हक्काची ग्रंथालय इमारत आम्हाला मिळणार की नाही, असे शेकडो विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. याच विद्यार्थ्यांच्या प्रश्न लक्षात घेत भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी हा प्रश्न निवेदनाच्या माध्यमातून नगर पंचायत गोंडपिपरी येथील मुख्याधिकारी कडे निवेदन देण्यात आले
गोंडपिपरी शहरातील नगरपंचायत स्थलांतर इमारत हे महात्मा गांधी तालुका वाचनालय म्हणून निधी उपलब्ध करुन बांधकाम पूर्ण झाले. ती इमारत विद्यार्थ्यांच्या अभ्यासण्यासाठी सुरू करण्या करीता भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी तर्फे माननीय मुख्याधिकारी नगरपंचायत गोंडपिपरी यांना निवेदन देण्यात आले. ती आमच्या हक्काची ग्रंथालय इमारत आम्हाला मिळाली नाही तर आम्ही नगरपंचायत समोर आंदोलन करु असा भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे सक्षम कार्यकर्ता कु. प्रज्वल बोबाटे व अन्य कार्यकर्त्यांनी इशारा देण्यात आला आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष श्री सुनील फुकट, भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे सक्षम कार्यकर्ता कु. प्रज्वल बोबाटे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.