भाजयुमो जिल्हा सचिव दिलीप गिरसावळे यांचा वाढदिवस उत्सहात साजरा.

Bhairav Diwase
माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे यांची प्रमुख उपस्थिती.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील खामोना येथील भाजपा युवा नेतृत्व तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव श्री दिलीपजी गिरसावळे यांचा वाढदिवस माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,दिलीप गिरसावळे हे भाजपचे युवा नेतृत्व मनुन कार्य करत आहे,मागील अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला,भाजपचे संघटन वाढीव साठी मोलाचे योगदान देण्याचे कार्य सुद्धा करण्याचे काम ते करत असतात,त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा यावेळी माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे यांनी दिल्या.

यावेळी वाढदिवस कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करत असताना यावेळी जिल्हा परिषद सभापती सुनिल उरकुडे, भाजपचे जेष्ठ नेते अरुण मस्की,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, हरिदास झाडे,प्रकाश उत्तरवार, संजय उपगनलावर, तुकाराम वारलवार,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,तालुका महामंत्री प्रशांत घरोटे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,ओबीसी आघाडी महामंत्री संदीप पारखी,आदित्य भाके,कैलास कार्लेकर,प्रदीप मोरे,रत्नाकर पायपरे, प्रशांत साळवे,आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून दीर्घ आयुष्यच्या शुभेच्छा देण्यात आल्या.