(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली तालुक्यातील बोथली येथे बिबट्याचा उपद्रव सुरूच असून बोथली इंदिरानगर गावात बिबट्याने एका शेळीला ठार केले. या अगोदरही शेळीला गोठ्यात येवून ठार केले होते. बिबट रात्रीच्या वेळेला गावाच्या आसपास येऊन राहत असल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्रीच्या सुमारास मुक्तेश्वर गंगा गेडाम यांच्या घरी येऊन गोठ्यातील शेळीला बिबट्याने घेऊन जाऊन गावालगतच्या सुधाकर रामिडवार यांच्या शेतात नेऊन ठार केले. याची माहिती वनविभागाचे वनरक्षक चौधरी यांनी घटनास्थळी येऊन मृत शेळीचा पंचनामा केला. दरम्यान, सध्या शेतीचे हगांम सुरु असल्याने बिबट्याचा वावर परिसरात असल्याने स्थानिक लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी प्रकाश वरगटीवार , नंदकिशोर गेडाम, जगदीश गेडाम, सुनील कोरेवार यांनी केली आहे .