विरूर स्टेशन गावातील युवकांनी 28 जनावरांना दिले जिवनदान.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन- धानोरा मार्गावर TS 15 UA 3647 या गाडीतून 28 जनावर तस्करी होत असल्याची माहिती विरूर स्टेशन गावातील युवकांना कळली. काल रात्रौ 12 च्या सुमारास गावातील युवकांनी जनावर तस्करांची गाडी पकडली. त्यानंतर युवकांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहीती दिली. त्या गाडीमध्ये ऐकून 28 जनावर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना जीवनदान दिले.
API कृष्णा तिवारी यांच्या नेतृत्वखालील PSI आनंद वाडतकर यांनी ही चोकशी करून गौरक्षण संस्था इथे त्या 28 जनावरांना ताबडतोब पाठविण्यात आले. व जनावर तस्कर करणाऱ्यांना आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल, पुढील तपास पोलीस करत आहे.