गोंडपिंपरी:- गाव तिथे शाखा अभियानांतर्गत जिल्ह्यातील जनतेचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद युवा स्वाभिमान पार्टीचे युवा नेता सुरज ठाकरे यांना मिळत आहे.
दिनांक ०७/११/२०२० रोजी गोंडपिंपरी तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व कामगार यांनी युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये युवा स्वाभिमान पार्टी मध्ये प्रवेश केला यावेळी गोंडपिंपरी शहरातील सफाई कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते व जिल्ह्यामध्ये प्रभावी व एक मार दोन तुकडे अशी ख्याती असलेले एकमेव व कामगार नेतृत्व सुरेश ठाकरे यांना त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सांगितले व या संदर्भामध्येसुरेश ठाकरे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून होत असलेला अन्याय ताबडतोब बंद करावा याबाबत सूचना दिल्या तसे न झाल्यास अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी आवाज उचलू असे सांगितले.
एकंदर युवा स्वाभिमान पार्टीचा वाढता ओघ पाहता लवकरच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक सक्षम नेतृत्व व मोठा जनाधार युवा स्वाभिमान पार्टी मिळत असल्याचे चित्र हळूहळू निर्माण होत आहे भविष्यामध्ये देखील अशाच प्रकारच्या मोठ्या संख्येने प्रवेशाचे कार्यक्रम होत राहतील असे याप्रसंगी युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी सांगितले यावेळी त्यांच्या सोबत राहुल चव्हाण, सुनील चव्हाण, निखिल बजाइत, अजवान टाक, कुकू सोनाई, मोहब्बत खान, नदीम सय्यद, प्रकाश वानखेडे, बबलू चव्हाण, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.