डॉक्टरचा हलगर्जीपणा बेतला होता जिवावर.
बल्लारपूर:- शहरातील गणपती वॉर्ड मधे राहणार्या एका महिलेची काल दुपारच्या सुमारास प्रकृती बिघडल्याने तिला तपासणीकरिता चंद्रपूरला नामांकित डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून उपचार महिलेला रुग्णालयात दाखल करून सुरू केले.
उपचारादरम्यान त्या महिलेची प्रकृती खालाऊ लागली आणि काही वेळाने तिची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाल्याने नातेवाइकांनी बल्लारपूर येथिल तिच्या निवासस्थानी पोहोचून शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली.
दरम्यान रात्री नऊच्या सुमारास सदर मृत महिलेच्या शरीरात हालचाल सुरू झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात येताच सर्वांनी त्या महिलेस तत्काळ पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथील हलविले.
तथाकथित मृत महिलेने योग्य उपचारांना प्रतिसाद देणे सुरू केले असुन नागपूर येथिल रुग्णालयात तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे अशी माहिती मिळाली आहे.
जर त्या महिलेच्या हालचालीकडे लक्ष गेले नसते आणि अंत्यसंस्कार करण्यात आले असते तर काय अनर्थ घडला असता ह्याची कल्पनाही करता येत नाही अशी स्थिती आहे. डॉक्टर वर आपला संपुर्ण विश्वास टाकुन रुग्ण स्वतःचा प्राण त्याच्या हवाली करतात त्या डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे संताप व्यक्त होत असुन ह्या डॉक्टर वर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.