हातात आलेले पिक करपल्याने शेतकरी चिंतातूर.

Bhairav Diwase
पिकांचे पंचनामे करुण आर्थिक नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
फुटाना:- फुटाना ( भीमनगर ) येथील कर्तबगार होतकरू म्हणून उदयास आलेले शेतकरी रविंद्र पत्रुजी तेलसे त्यांची भीमनगर येथे जवलपास ५ एकर शेती आहे. या संपूर्ण शेतीवीर भात पिकाची लागवड केलेली होती. यावर्शी पिक सुधा मोठ्या जोमाने आले. आधीच शेतकरी मागिल ८ महिन्यपासून कोरोना च्या संकटात होरपडलेले होता. तीच संसाराची गाड़ी पटरिवर आली नाही आणि त्यातच निसर्गाने मोर्चा वडविला तो शेतकरी वर्गांच्या धान व कापुस पिकावर मोठ्या कष्टाने शेतकरी दादाणे आपले शेतातील पिक उभे करुण भविष्याची स्वप्ने रंगवित असताना. अचानक पिकावर आलेल्या रोगाने जेमतेम रविंद्र तेलसे या प्रगत शेतकऱ्यांचे जवड पास ३ एकर शेत मावा, तुडतुडा या रोगाने उध्वस्त केले. परिणामी रविंद्र तेलसे हे शेतकरी खुप मोठ्या संकटात सापडले असुन, पुढिल वर्षीचा हंगाम कसा ऊभा करावा याची समीकरने जुडवने खुप कठिन आहे. तरी सदर शेतकरी सोबत इतरही शेतकऱ्यांना शासनाने पिकांचे पंचनामे करुण आर्थिक नुकसान भरपाई देण्याची तरतूद करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.