Click Here...👇👇👇

भाजपच्या वतीने वीज देयक माफीसाठी टाळा ठोको हल्लाबोल आंदोलन.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर वा. नरड वरोरा
वरोरा:- भाजपच्या वतीने वीज देयक माफीसाठी टाळा ठोको हल्लाबोल आंदोलन दि 5/2/2021 ला वरोरा येथे संपन्न झाला. कोरोना काळात भरमसाठ वीज बिल पाठवणाऱ्या वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून जनतेला अंधारात टाकण्याचे महापाप करणाऱ्या महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर यांच्या मार्गदर्शनात वरोरा येथील वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. येथील वीज वितरण मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकून शासनाचा निषेध करून वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आले यावेळी ओमभाऊ मांडवकर तालुका महामंत्री ,बाबा भाऊ भागडे ज्येष्ठ नेते भाजपा ,डॉ गायकवाड साहेब जिल्हा उपाध्यक्ष भाजपा ,अहेतेश्याम अली नगराध्यक्ष वरोरा ,सचिन नरड जिल्हा महामंत्री भाजयुमो ,सुरेश महाजन शहराध्यक्ष वरोरा, सायरा शेख महामंत्री जिल्हा महिला आघाडी, विनोद लोकरे माजी नगराध्यक्ष ,दिलीप घोरपडे बांधकाम सभापती,  अमीत चैवले जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो ,महेश श्रीरंग जिल्हा सचिव भाजयुमो,  मानकर सर ,राजूभाऊ बच्चुवार, श्रीकांत पेचे , ईश्वर नरड ,  देवदास ताजने ,अजय लोडे ,नीलकंठ वरभे , वाकडे सर ,  संजु राम ,अमित आसेकर , प्रतीक काळे, महेश देवतळे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते