Top News

मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार साहेब यांचे नेतृत्वात नागभीड येथे उप कार्यकारी अभियंता महावितरण विभाग नागभीड यांचे निषेधार्थ भाजपा तालुका नागभीड तर्फे हल्‍ला बोल व ताला ठोको आंदोलन संपन्न.


Bhairav Diwase.     Feb 05, 2021

नागभीड:- भारतात मार्च महिन्यापासून कोरोना प्रदूर्भाव आल्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउनची घोषणा केली होती.लॉकडाउनच्या मार्च ते जून ह्या तीन महिन्याच्या काळात विज-वितरण तर्फे ग्राहकांना विजबिलाचे वितरण करण्यात आले नाही.
तसेच ह्या दरम्यान सामान्य जनतेची झालेली आर्थिक कोंडी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य शासनाने ह्या तीन महिन्यांच्या काळातील विजबिलात सूट देण्याची व 100 युनिट पर्यंत विजबिल माफ करण्याची माफी देण्याची घोषणा केली होती.

     परंतु महाराष्ट्र सरकारने विजबिलात सूट व माफी देण्याऐवजी ग्राहकांना ह्या तीन महिन्यांच्या काळात अवाढव्य बिले पाठवली व सूट-माफी देण्याऐवजी महाराष्ट्र राज्य सरकारने ग्राहकांना विजबिल भरण्यासाठी दबाव आणत असून मा.ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य हे वारंवार आपल्या घोषणांपासून घुमजाव करून जीवन जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या गरीब जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे.
अशातच महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना कनेक्‍शन तोडण्‍याची नोटीस पाठवुन राज्‍यातील जनतेला अंधारात टाकण्‍याचे पाप केले आहे.
   राज्‍यातील संवेदनाहीन महाभकास आघाडी सरकारने नागरिकांचा छळ चालविला आहे. लॉकडाऊनच्‍या काळात गरिब जनतेला अवाजवी रकमेची बिले पाठवुन आता त्‍यांचे कनेक्‍शन कापण्‍याचा पाप राज्‍य सरकारने केलेला आहे.
   म्हणून ह्या निषेधार्थ मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमुर विधानसभा क्षेत्र यांचे नेतृत्वात भारतीय जनता पार्टी तालुका नागभीड तर्फे आज दिनांक 05/02/2021 रोजी उप कार्यकारी अभियंता महावितरण विभाग नागभीड येथे विज बिलांची होळी तसेच महावितरण कंपनीच्‍या विरोधात हल्‍ला बोल व ताला ठोक आंदोलन पुकारण्यात आले. व संबंधित अधिकारी यांना विद्युत बिल माफ करण्याविषयक निवेदन देण्यात आले. 
या आंदोलनात उपस्थिती म्हणून मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमुर विधानसभा क्षेत्र, मा.वसंतभाऊ वारजुरकर, श्री.संतोषभाऊ रडके भाजपा तालुका अध्यक्ष,श्री.आवेशभाऊ पठाण,श्री.रमेशजी बोरकर,श्री.दयारमजी कन्नाके,श्री.आनंदजी कोरे,मोरेश्वरजी ठिकरे,श्री.सचिनजी आकुलवार,श्री.जगदीश सडमाके,रागिनीताई गुरपुडे,इंदुताई आंबोरकर,नितुताई येरने* व भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच नागभीड तालुक्यातील सर्व विज ग्राहकांनी उत्‍स्‍फुर्तपणे सहभागी होवुन राज्‍य सरकारच्‍या विरोधातील आपला असंतोष प्रकट केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने