Top News

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर.


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- तबाखू सेवन करणा-याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. युवा पिढी व्यसनाने अखंड बुडलेली आहे.भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होणा-याची संख्या झपाट्याने वाढत आहे. तंबाखू विरोधी जनजागृती करण्यासाठी तंबाखू नियंत्रण विषयावर टाटा मेमोरियल सेंटर मुंबई, सेंटर फाॅर कॅन्सर इपीडेमियाॅलाजी मुंबई व राष्ट्रीय तंबाखु मुक्ती सेवा केंद्र (१८००-११-२३५६)यांच्या वतीने तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी ७२व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
       या स्पर्धेत प्राथमिक ,माध्यमिक,उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक,राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी यांनी या स्पर्धेत भाग घेतला.या स्पर्धेत एकुण १४१स्पर्धकांनी भाग घेतला.
      या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत क्रांती शिंदे (कोल्हापूर) यांनी प्रथम क्रमांक,द्वितीय क्रमांक विजय गोसावी (जळगाव),तृतिय क्रमांक भाग्यश्री टिल्लू (मुंबई) तर चतुर्थ क्रमांक धनराज रघुनाथ दुर्योधन (चंद्रपूर) यांनी पटकावला.स्पर्धेतील विजेत्याना बक्षिस अनुक्रमे पाच हजार रुपये,चार हजार रुपये,तीन हजार रुपये व एक हजार रुपये ,मानचिन्ह व प्रमाणपत्र होते.सहभागी सर्व स्पर्धकाना प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.टाटा मेमोरियल  सेंटर येथील सेंटर फाॅर कॅन्सर इपिडेमियाॅलाजी मुंबईचे संचालक मा.डाॅ.राजेश दिक्षित,उपसंचालक मा. डाॅ.पंकज चतूर्वेदी ,प्रकल्प प्रमुख  मा.डाॅ.अतुल बुडुख आणि राष्ट्रीय तंबाखू मुक्ती सेवा केंद्राचे पर्यवेक्षक मा.दिनेश मुसळे सर, दीपा कदम मॅडम, प्रविण भीरंगी सर, तसेच  डॉ.सुवर्णा मॅडम, डॉ. राहुल सर,गणेश सर, कल्पिता मॅडम, सोनाली मॅडम श्रद्धा मॅडम तसेच सर्व समुपदेशक या
सर्वानी उत्तम प्रकारे नियोजन करुन ही राज्यस्तरीय निबंध स्पर्धा यशस्वी केली.सर्व स्पर्धकाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून भारत तंबाखू मुक्त करण्यास सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने