Top News

वीज कनेक्शन कापाल तर खबरदार:- प्रा. अतुल देशकर.

भाजपाचा महावितरण कार्यालयावर हल्लाबोल.

महिला आघाडीने केली वीज बिलांची होळी.
Bhairav Diwase.     Feb 05, 2021
ब्रम्हपुरी:- लॉकडाऊन काळात महाराष्ट्र सरकारच्या महावितरण कंपनीने राज्यातील नागरिकांना अवास्तव विजेचे बील पाठविले. सदर वीजबिल माफ करू अशी घोषणा ऊर्जा मंत्र्यांनी केली होती. मात्र अद्याप वीज बिल माफ करण्यात आलेले नाही. वरून ज्या नागरिकांनी वीज बिल भरले नाही त्या नागरिकांचे वीज कनेक्शन कापण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार व महावितरण कंपनीच्या विरोधात ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी तालुका व शहराच्या वतीने ब्रह्मपुरी येथील महावितरण विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.


या प्रसंगी ब्रम्हपुरी शहरातील प्रमुख चौकात सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व भाजपा महिला आघाडीच्या वतीने वीज बिलांची होळी करण्यात आली. या प्रसंगी माजी आमदार प्रा. अतुल देशकर, ओबीसी आघाडी प्रदेश कार्यकरिणी सदस्य प्रा.प्रकाश बगमारे, पं. स सभापती प्रा.रामलाल दोनाडकर, शहर महामंत्री व नगरसेवक मनोज वठे यांनी भाषणात सरकारचा निषेध नोंदवला.


शेतकऱ्यांचे नागरिकांचे वीज मीटर तुमच्या बापाचे नाही, वीज कनेक्शन कापाल तर होणाऱ्या परिणामांना भाजपचे कार्यकर्ते जवाबदार राहणार नाही असा इशारा माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी शासन व प्रशासनाला दिला.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विभागीय कार्यकारी अभियंता श्री.काळे यांना निवेदन देण्यात आले. प्रसंगी पोलिसांनी अडवल्याने कार्यकर्त्यांना कार्यालयाला कुलूप लावता आले नाही.

या प्रसंगी जेष्ठ नेते अरुण शेंडे, माजी शहर अध्यक्ष फकिरा कुर्वे, भाजपा शहर महामंत्री मनोज भूपाल, कोषाध्यक्ष अरविंद नंदूरकर, जेष्ठ कार्यकर्ते सुधीर सेलोकर, पंचायत समितीच्या उपसभापती सुनीता ठवकर, माजी सभापती प्रणाली मैंद, नगरसेवक सागर आमले, नगरसेविका पुष्पा गराडे, माजी जि.प सदस्य रामू निहाटे, पं. स सदस्या उर्मिला धोटे, पं. स सदस्या ममता कुंभारे, पं.स सदस्य विलास उरकुडे, माजी नगरसेवक संजय बावनकुळे, माजी नगरसेविका अनघा दंडवते, माजी नगरसेविका हेमलता नंदूरकर, जिल्हा कार्य. सदस्य ज्ञानेश्वर भोयर, प्रा. संजय लांबे, साकेत भानारकर, ऍड. जयप्रकाश अंडेलकर, उत्तम उरकुडे, मुनींश्वर सेठीये, भा.ज.यु.मो शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा कार्य. सदस्य लिलाराम राऊत, शहर महामंत्री रितेश दशमवार, स्वप्नील अलगदेवें, सचिव दत्ता येरावार, उपाध्यक्ष पवन जयस्वाल, ओबीसी आघाडी शहर अध्यक्ष पंकज माकोडे, राहुल सुभेदार, ललित उरकुडे, कृष्णा वैद्य, अमित कन्नाके, निखिल पाठक, बापू चव्हाण, राजेश्वर मगरे, अनिल नाकतोडे, चूमदेव जांभुळे, मोरती ठेंगरी, सदाशिव ठाकरे, राजू शिवरकर, नानाजी गराडे यांच्या सह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने