प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून महाविकास आघाडी सरकारचा निषेध.
सामान्य नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग.
चंद्रपूर:-:कोरोना काळात भरमसाठ विजबिल पाठवणाऱ्या व विज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून जनतेला अंधारात टाकण्याचे महापाप करणाऱ्या महविकास आघाडी सरकारच्या विरोधात "टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन" माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराजभय्या अहिर यांच्या मार्गदशनात व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात
भारतीय जनता पार्टी,घुग्घूसच्या वतीने
शुक्रवार 05/02/2021 रोजी
सकाळी 11 वाजता.
गांधी चौक, घुग्घूस येथे करण्यात आले.
ही यात्रा घुग्गुस वस्ती, अमराई, विठ्ठल मंदिर, आठवडी बाजार मार्गे मार्गक्रमण करीत बस स्थानक चौकात धडकताच तिथे प्रतिकात्मक प्रेतयात्रेचे दहन केले.
घुग्गुस परिसरात सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढून घुग्गुस वासियांचे लक्ष वेधले होते.
एमएसईबी कार्यालयात जाऊन कर्यालयास टाळा ठोकून टाळा ठोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले गोर गरिबांचे वीज बिल माफ करण्यासाठी भाजपाने 4 वेळा आंदोलन केले. याची दखल घेऊन सरकारने वीज बिल माफ करू असे उत्तर दिले. विधानसभेत 100 युनिट प्रति महिना माफ करू असे सांगितले ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिल माफ करू असे सांगितले. हे सरकार फसवी, दिशाभूल, खोटे आश्वासन देणारी सरकार आहे. सरकारने वीज माफिचा शब्द पाडला नाही.
आज पुन्हा राज्यातील 75 लाख गोर गरीब कुटुंबियांना वीज कनेक्शन कापण्याची नोटीसा दिल्या असा त्रास सहन केला जाणार नाही.
कोणाचेही वीज कनेक्शन भाजपाचा कार्यकर्ता कापू देणार नाही. एमएसईबी चे कर्मचारी जर वीज कनेक्शन कापण्यास गेले तर भाजपाचा कार्यकर्ता परतवून लावेल. असे ते म्हणाले
आंदोलना दरम्यान कुठं गेले कुठं गेले 200 युनिट कुठं गेले, महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद, काँग्रेस सरकार मुर्दाबाद असे नारे लावण्यात आले.
याप्रसंगी घुग्गुसचे ठाणेदार श्री राहुल गांगुर्डे तसेच महावितरणचे सहाय्यक अभियंता अमोल धूमणे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव डाहुले, भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे, भाजपा जिल्हा महामंत्री अनिल डोंगरे, प.स.माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा,माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी, साजन गोहणे, प्रकाश बोबडे,सिनु इसारप,सुचिता लुटे,वैशाली ढवस, नंदा कांबळे, पूजा दुर्गम, नकोडा माजी उपसरपंच किरण बांदूरकर, मार्डा माजी सरपंच पारस पिंपळकर, विजय आगरे, माजी तंमूस अध्यक्ष हसन शेख, मल्लेश बल्ला, निरंजन डंभारे, प्रवीण सोदारी, बबलू सातपुते, नितीन काळे, विवेक तिवारी, राजेश मोरपाका, अनिल मंत्रिवार, गुरूदास तग्रपवार, भाजपा महिला आघाडीच्या सुरेखा डाखरे, जनाबाई निमकर, रेखा पाटील, प्रिया बोरकर, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.