पैनगंगा वेकोली ओपन काष्ट मध्ये अपघात कामगाराचा मृत्यू.

Bhairav Diwase
कामगारांमध्ये तणावाची स्थिती.

नुकसानभरपाई देणार नाही तो पर्यंत मृत्यूदेह उचलणार नाही कामगार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- पैनगंगा ओपणकास्ट प्रकल्पात 5 फेब्रुवारीच्या मध्यरात्री इलेक्ट्रिशियन सचिन करमनकर हे लोडिंग मशीनच्या वायरिंग चे काम करीत असताना अचानकपणे मशीनच्या चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला . ASDC कंपनीतील इलेक्ट्रिशियन सचिन करमनकर नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होते . मात्र मध्यरात्री 2 ते 3 वाजेदरम्यान लोडिंग मशीनच्या वायरिंग मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने करमनकर यांना बोलाविण्यात आले . मशीनच्या वायरिंगचे काम करीत असताना बाजूला सरफेस मायनर मशीनचे काम सुरू झाल्या त्या मशीनच्या कंपनामुळे अचानक लोडिंग मशीन मागे आली.

 कारण त्या मशीनचे हॅन्डब्रेक वाहन चालकाने लावले नव्हते . लोडिंग मशीनच्या चाकात आल्याने सचिन करमनकर यांचा जागीच मृत्यू झाला ते वय अंदाजे 28 वर्षाचे होते. या घटनेमुळे पुन्हा एकदा वेकोली प्रशासनाचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. खाजगी असो की शासकीय कर्मचारी, वेकोली सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नेहमी मागेच असते. या दुर्घटनेनंतर कामगारात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे .