पोंभुर्णा:- भारतीय जनता पार्टी तालुका पोंभुर्णा च्या वतीने कोरोना विषाणु (कोवीड -19)चा प्रार्दुभावामुळे संपुर्ण भारतभर संचारबंदी लागु केलेली होती. सदर काळात सामान्य नागरीकांना तसेच शेतकऱ्यांना कुठलेही काम नसल्यामुळे त्यांना आर्थीक संकटाना सामोरे जावे लागले.त्यातच नागरिकांना व शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा बिल देण्यात आले. या अवाजवी बिल माफ करण्यासंदर्भात आज पोंभुर्णा येथे हल्ला बोल व ताला ठोक आंदोलन महावितरण कार्यालया समोर करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व अजय दुबे प्रदेश महासचिव भाजपा कामगार आघाडी, आशिष देवतळे जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, गजानन गोरंटिवार भाजपा तालुका अध्यक्ष, अल्काताई आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा, ईश्वर नैताम तालुका महामंत्री, रुषि कोटरंगे शहर अध्यक्ष, अजीत मंगळगिरीवार, दिलीप कलवार,मनोज रणदिवे,चरण गुरनुले,बंडु बुरांडे,मोहन चलाख,गुरुदास पिपरे,राजु ठाकरे ,स्वेता वनकर,रजिया कुरेशी,सुनीताकलवार,वैशाली बोलमवार,शारदा कोडापे तसेच भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्त मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.
पोंभुर्णा भाजपाचे वीज देयक माफी करिता टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन.
शुक्रवार, फेब्रुवारी ०५, २०२१
Tags