🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

किराणा मालाचे तथा खाद्य पदार्थाचे विना परवाणा पॅकेजींग करणाऱ्या दुकान दार आणि शॉपिंग मॉलवर कार्यवाही करा.

अखिल भारतिय ग्राहक पंचायत भद्रावती यांची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरातील अनेक मोठे किराणा दुकानदार आणि शॉपिंग मॉल यांच्याकडे किराणा धान्य, सुकेमेवे आणि ईतर खाद्य वस्तु विना परवाणा हवाबंद पॅकेजींग करून विकल्या जात आहे. त्यावर कुठलीही निर्मितीची आणि उपयोगाच्या अंतिम तिथीची नोंद न करता तसेचं नियमानुसार कोणतीही अन्न प्रक्रिया न करता पॅकेजींग केल्या जात आहे.
     त्यामुळे पॅकेजींग केलेल्या वस्तुच्या वापराची अंतिम तिथी आणि गुणवत्ता कशी आहे हे कळत नाही. तसेचं त्या वस्तु खाण्यायोग्य आहे किंवा नाही हेही कळत नाही. कित्येकदा पॅकेजींग वस्तु खराब निघतात.
          काही ठिकाणी तर पॅकेजींग तारिख आणि अंतिम तिथी संपली की त्यावर पेनाने खोड तोड करून समोरची तारिख लिहील्याचे निदर्शनास आले आहे. अशा अन्न पदार्थांचे सेवन केल्यास मानवी आरोग्याला धोका होवु शकते.
                हे सर्व लक्षात घेवुन  योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतिय ग्राहक पंचायत भद्रावती पदाधीकारी प्रविण चिमुरकर, वामण नामपल्लीवार, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे आणि गोपिचंद कांबळे यांनी अन्न व औषध प्रशासन चंद्रपुर तथा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपुर यांचे कडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत