नारियल पाणी विकणाऱ्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.          Feb 22, 2021
भद्रावती:- चंद्रपुर मुख्य मार्गावर नारियल पाणी विकणाऱ्या  युवकाने आपल्या गोदामात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

आनंद यादव वय 26 वर्ष राहणार जोनपुर युपी असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून हा उदय लॉज समोरील भागात नारियल पाणी विक्री करण्याचे काम करीत होता त्याच्याच बाजूला यांचे गोदाम असून त्या गोदामात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली घटनेची माहिती ठानेदार सुनील सिंग पवार यांना होताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक गजानन तेलरांधे हे पोहचले घटनेचा पंचनामा करून आत्महत्याच कारण अजून अस्पष्ट असून पुढील तपास पोलिस करीत आहे.