TV 9 मराठीचा मोठा खुलासा......
Bhairav Diwase. Feb 22, 2021
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होऊ लागल्याने शासन, प्रशासनासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बऱ्याच कालावधीनंतर राज्यातील जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनातून कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचीही माहिती दिली.
लॉकडाऊन करायचा का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार. ज्यांना नकोय ते मास्क घालून फिरतील, हवाय ते विना मास्क फिरतील, मास्क घाला, लॉकडाऊन टाळा असेही ते म्हणाले.
काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर काही वेळातच एक फोटो व्हायरल झाला. त्या व्हायरल फोटो मध्ये खालील दिलेला मजकूर लिहिला आहे. आणि हा फोटो TV9 मराठी च्या नावाने व्हायरल केला जात आहे.
परंतु TV9 मराठी यांनी त्या फोटोचा खुलासा केला आहे... TV9 मराठी यांनी म्हटले कि अश्या प्रकारची बातमी आम्ही दाखवली गेलेली नाही. कुणीही अफवा वर विश्वास ठेवू नये.
आधार न्यूज नेटवर्क टिमतर्फे आपल्या आव्हान करण्यात येत आहे कि, कुणीही अफवा वर विश्वास ठेवू नये. व्हायरल होणारा फोटो कुणीही आपल्या स्टेट्स ला टाकू नये. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन होणार कि नाही? ते काही दिवसांतच आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला सांगणार आहे.