🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

कोंडेखल ग्रामपंचायतवर भाजपाचे वर्चस्व.

सरपंच पदी सौ. सरला पिंटू कोटांगले तर उपसरपंच श्री. नरेश बाबनवाडे यांची एकमताने निवड.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- तालुक्यातील कोंडेखल ग्रामपंचायत मध्ये भाजपा पक्षाने सत्ता काबीज केली आहे. यामध्ये एकतर्फी सत्ता भाजपच्या हातात गेलेली आहे. कोंडेखल ग्रामपंचायत ही 9 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. आज कोंडेखल ग्रामपंचायत मध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये सरपंच म्हणून सौ. सरला पिंटू कोटांगले यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे. तर उपसरपंच म्हणून श्री. नरेश बाबनवाडे यांची निवड करण्यात आली आहे.  त्यांना निवड करण्यासाठी नवनियुक्त सदस्य श्री. भाऊराव पेंदोर तसेच सौ. प्रियंका मोहन हुलके आणि सौ. फुलवंती राजू गोहणे यांनी अनुमोदन दिले.