अपंग कल्याण निधी अंतर्गत ग्रामपंचायत नांदा तर्फे नुकतेच गावातील 47 दिव्यांगांना अन्नधान्य व गरजूना वस्तूच्या किटचे वाटप.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- अपंग कल्याण निधी अंतर्गत ग्रामपंचायत नांदा तर्फे नुकतेच गावातील 47 दिव्यांगांना अन्नधान्य व गरजूना वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले .यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश पेंदोर उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले ग्राम विकास अधिकारी पंढरी गेडाम ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप प्रमोद खिर टकर आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते .याआधी करोना काळातही गावातील दिव्यांग व्यक्ती ना ग्रामपंचायत मार्फत अन धान्य वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले .वेळोवेळी अपंग व्यक्तींना ग्रामपंचायत सहकार्य करीत असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे. गावातील दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या योजनां चा  लाभ देता यावा यासाठी ग्रामपंचायत मार्फत प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले यांनी यावेळी सांगितले. तर गावातील जनतेने करवसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी ग्राम विस्तार अधिकारी पंढरी गेडाम यांनी केले. गावातील कर वसुली झाल्यास गावातील नागरिकांना मोठ्या सुविधा व दिव्यांग  व्यक्तींना सुद्धा चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे ही ते  म्हणाले. धान्याच्या किटमध्ये तांदूळ गहू तेल साखर डाळ नि रमा मीठ हळद चहा पत्ती आदी वस्तूंचा समावेश आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने