🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

भद्रावतीत खुल्या प्लाॅस्टिक बाॅल क्रिकेट सामन्यांचे आयोजन.

बजरंग दलाचा पुढाकार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद संलग्नित स्थानिक बजरंग दल शाखेतर्फे दि.२७ व २८ फेब्रुवारी रोजी येथील पांडव वार्डातील हनुमान नगर येथील मैदानावर भव्य दोन दिवसीय प्लाॅस्टिक बाॅल क्रीकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
सामन्यांचे उद्घाटन दि.२७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता विदर्भ प्रांत अध्यक्ष नंदूभाऊ गट्टूवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष शंकर अरोरा सरदार राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय बजरंग दल  जिल्हाध्यक्ष शिवा सारसर, उपाध्यक्ष आकाश कोडमवार, राष्ट्रीय महिला परिषद जिल्हाध्यक्ष सुशीलाताई मल्ले, ओजस्विनी जिल्हा उपाध्यक्षा दीक्षाताई ऐडला, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुयोग खटी, सामाजिक कार्यकर्ते योगेश गाडगे, विक्की बांगर, पप्पू तिडके, अशोक खडसे, मनीष भटवलकर उपस्थित राहणार आहेत. 
                
  सामन्यात प्रथम बक्षीस ११ हजार रुपये, द्वितीय बक्षीस ७ हजार रुपये आणि तृतीय बक्षीस ४ हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच आकर्षक वयक्तिक बक्षीसही ठेवण्यात आले आहे.५५० रुपये प्रवेश शुल्क असून ते दि.२६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहे. क्रीकेटप्रेमींनी या सामन्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे नितीन बावणे, अतुल दोडके, विवेक दुर्गे, मनीष भटवलकर, रुपेश टोंगे, कबिर देवगडे आणि राजकुमार चौखे यांनी केले आहे.