🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आठवडी बाजार करून येताना दुचाकी चा अपघात.

अपघातात बापाचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी.
Bhairav Diwase.    Feb 19, 2021
चिमूर:- चिमूर येथील आठवडी बाजार करून बाप लेक तळोधी (नाईक ) गावा कडे जात असताना दहिकर विद्यालय तळोधी( नाईक) समोरील रस्त्यावर कोलारा येथील तीन व्यक्ती समोरून येत असताना दोन दुचाकीचा जबरदस्त अपघात झाला असून यात एक राजेश्वर कामडी वय ३८ वर्ष हा ठार झाला असून इतर जखमी झाले.

चिमूर येथील आठवडी बाजार करून तळोधी (नाईक ) येथील राजेश्वर कामडी व त्याचा मुलगा राहुल हे आपला बाजार करून गाव कडे निघाले असता गावा जवळील दहिकर विद्यालय समोर समोरून येणाऱ्या टीबल सीट असलेल्या दुचाकी ची भिडत होऊन जबरदस्त अपघात झाला असून यात राजेश्वर कामडी वय ३८ वर्ष याचा मृत्यू झाला असून मुलगा राहुल गंभीर जखमी झाला असून समोरून येणारे ते तिघे ही जखमी झाले आहे जखमीचा उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार करण्यात आले जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कलीम शेख यांनी भूमिका पार पाडली असून या दुःखद घटनेने तळोधी येथील शिवजयंती कार्यक्रम रद्द करण्यात आला या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत