🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

वीज कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.


Bhairav Diwase. Feb 20, 2021
चंद्रपुर:- महावितरण चंद्रपूर उपविभाग एक अंतर्गत हॉस्पिटल शाखा वीज वितरण केंद्राचे मुख्य तंत्रज्ञ प्रेमानंद खंडाळे, महेश कातकर, सरला झाडे, गणेश वासेकर हे वीज बिल थकबाकी वसुलीसाठी जटपुरा गेटजवळील कुरेशी बिल्डिंगमधील वीज ग्राहक कुरेशी यांच्याकडे गेले होते. कुरेशी यांना २२ जानेवारी २०२१ रोजी थकीत वीज बिल भरण्याची नोटीस दिली होती. मात्र, त्यांनी भरण्यास नकार दिला. दरम्यान, तंत्रज्ञ महेश कातकर हे खुर्चीवर उभे राहून वीज खंडित करताना साजिद कुरेशी याने धक्का देऊन खाली पाडले तर मोहम्मद कुरेशी याने मुख्य तंत्रज्ञ खंडाळे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. वीज कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि ३५३, १८८, २९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत