Top News

शेगाव बु येथे मावळा ग्रुप तर्फे छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती सोहळा संपन्न.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर वा. नरड वरोरा
वरोरा:- शेगाव बु  येते गेल्या 2 वर्षांपासून मोठ्या उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा पार पडतो त्याच प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला  सरपंच सिद्धार्थ पाटील व उपसरपंच साधनाताई  मानकर यांनी पुष्पहार अर्पण केला महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.  गावामध्ये मोठया उत्साहाने व मोठ्या संख्येने   मिरवणूक काढण्यात आली प्रमुख उपस्थिती गावातील सर्वपक्षीय नेतेमंडळी, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, युवा वर्ग, मावळा ग्रुप सदस्य व गावकरी  वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने