Click Here...👇👇👇

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा वरोरा तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.      Feb 20, 2021
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर वा. नरड वरोरा
वरोरा:- 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभाविप वरोरा शाखेतर्फे शिवाजी महाराज यांच्या मूर्ती चे दुधाने राज्याभिषेक  करण्यात आले.  व  त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून  माल्यार्पण करण्यात आले.  व जल्लोष मध्ये 'भारत माता की जय'  'शिवाजी महाराज की जय ' 'जय जिजाऊ जय शिवराय' असे  वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या व सर्व कार्यकर्त्यांनी मूर्ती चे राज्याभिषेक करून  मुर्ती व प्रतिमेला फुल अर्पण करून आशीर्वाद घेतला  व मिठाईचे वाटप केले व कोरोना विषाणू चा वाढता प्रकोप लक्षात घेता मास्क व  सॅनिटायजर चा वापर करून सोशल  डिस्टसिंग चे पालन करून अशा प्रकारे अभाविप वरोरा शाखेतर्फे  शिवजयंती साजरी करण्यात आली. या अभाविप जिल्हा समिती सदस्य शकिल शेख, गणेश नक्षीणे, कुणाल घुमे, नगर मंत्री तृप्ती गिरसावळे,  महाविद्यालय प्रमुख लोकेश रुयारकर, विद्यार्थ्यींनी प्रमुख पूजा येरगुडे,  निधी राखुंडे, छकुली गेडाम, छकुली पोटे, स्वाती हनुमंनते ,करणं चिकटे, आदित्य गारगाटे, आदी अभाविप कार्यकते व शिवभक्त व असंख्य नागरिक उपस्थित होते.